वैजापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील रोटेगाव उड्डाणपुलावर सोमवारी (ता. ८) सायंकाळी खासगी बस आणि आयशरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात बसचालक गंभीर जखमी झाला. जखमी चालक स्टिअरिंगमध्ये अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी अक्षरशः ट्रॅक्टरचा वापर करावा लागला.
जी : ९००५) शिऊरच्या दिशेने जात होता.
उड्डाणपुलावर या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खासगी बस (क्र. एमएच १७ सीव्ही ५५५५) वैजापूरच्या दिशेने येत होती, तर आयशर (क्र. एमएच ४१ अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत बसचालक संदीप सोमनाथ निरगुडे (वय ५५ वर्षे रा. पांगरी ता. सिन्नर) यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतू ते स्टिअरिंगमध्ये इतके गंभीररित्या अडकले होते की, ट्रॅक्टरच्या साहाय्याने बसचा पत्रा ओढून त्यांना बाहेर काढावे लागले. निरगुडे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. आणि पुढील उपचारांसाठी त्यांना तातडीने शिर्डी येथे हलवले आहे.
तर याचवेळी दुचाकी घसरून अपघात झाल्याने साजिद पठाण (वय ३३, रा. खंडाळा), पल्लवी गोरे (वय २५) आणि किरण निकम (वय २६, दोघे रा. जरूळ) हे जखमी झाले. अपघातामुळे दोन्ही बाजूला सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख, प्रल्हाद जटाळे, ज्ञानेश्वर मेटे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला करून वाहतूक त्वरित सुरळीत केली.














